Skip to content
निर्गम ४:१०-१६

निर्गम ४:१०-१६

१०
मोशे याहवेहला म्हणाला, “आपल्या सेवकास क्षमा करावी, प्रभू मी चांगला वक्ता नाही, कधीही नव्हतो आणि आपण माझ्याबरोबर प्रत्यक्ष बोलत होता तेव्हाही नाही. मी मुखदुर्बल व जिभेचा जड आहे.”
११
याहवेह त्याला म्हणाले, “मनुष्यांना मुख कोणी दिले? त्यांना बहिरा किंवा मुका कोण करतो? त्याला कोण दृष्टी देतो? किंवा कोण आंधळे करतो? तो मी याहवेह नाही का?
१२
आता जा; मी तुला बोलण्यास मदत करेन आणि काय बोलावे ते तुला शिकवेन.”
१३
पण मोशे म्हणाला, “तुमच्या सेवकास क्षमा करावी, प्रभू. कृपा करून दुसर्‍या कोणाला पाठवा.”
१४
तेव्हा मोशेविरुद्ध याहवेहचा राग भडकला, ते म्हणाले, “लेवी अहरोन, तुझा भाऊ, याच्याविषयी काय? मला ठाऊक आहे की तो चांगले बोलू शकतो. तो तुला भेटावे म्हणून मार्गावर आहे, तुला पाहून त्याला फार आनंद होईल.
१५
तू त्याच्याशी बोलून त्याच्या मुखात शब्द घाल; मी तुम्हा दोघांना बोलण्यास मदत करेन, आणि काय करावे हे शिकवेन.
१६
तो तुझ्या वतीने लोकांबरोबर बोलेल, जसे तो तुझेच मुख आहे व तू त्याला परमेश्वरासारखा होशील असे मी करेन.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 90 chars

Options