Skip to content
एस्तेर ४:१-४

एस्तेर ४:१-४

जेव्हा मर्दखयाला समजले, ज्या सर्व गोष्टी करण्यात आल्या होत्या, तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडून, गोणपाट नेसून, अंगाला राख फासून व बाहेर शहरात जाऊन मोठमोठ्याने व अतिशय दुःखाने विलाप केला.
तो राजद्वारापर्यंतच जाऊ शकला, कारण गोणपाट पांघरूण राजवाड्यात प्रवेश करण्याची कोणाला परवानगी नसे.
साम्राज्यातील सर्व प्रांतांत जिथेही राजाज्ञा जाहीर झाली, तेथील यहूदी लोक उपवास व अत्यंत विलाप करीत, रडून आक्रोश करू लागले. अनेकजण गोणपाट नेसून राखेत पडून राहिले.
एस्तेरच्या दासींनी आणि खोजांनी येऊन तिला मर्दखयाबद्दल सांगितले, तेव्हा ती अतिशय खिन्न झाली. मर्दखयाने गोणपाट काढून वस्त्रे घालावी म्हणून तिने त्याच्याकडे वस्त्रे पाठविली, परंतु त्याने ते घेण्याचे नाकारले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options