मुख्य मजकुरावर जा
उपदेशक ९:१-६

जीवन व मृत्यूची अनिश्चितता

उपदेशक ९:१-६
मी या सर्वांवर मनन केले आणि हा निष्कर्ष काढला की नीतिमान व सुज्ञ आणि ते जे काही करतात ते सर्व परमेश्वराच्या हाती आहे, परंतु त्याच्यासाठी पुढे प्रेम किंवा द्वेष यापैकी काय ठेवले आहे हे कोणा मनुष्याला माहीत नसते.
सर्वांची नियती एकच आहे—नीतिमान आणि दुष्ट, चांगला आणि वाईट, शुद्ध आणि अशुद्ध, जे यज्ञार्पण करतात व जे करीत नाहीत. जसे चांगल्या व्यक्तीबरोबर, तसेच पापी व्यक्तीबरोबर; जसे शपथ घेणार्‍यांशी, तसेच जे ती शपथ घ्यायला घाबरतात त्यांच्याशी.
सूर्याखाली घडत असलेल्या प्रत्येक गोष्टीत हे वाईट आहे: एकसमान नियती सर्वांवर मात करते. शिवाय, लोकांची अंतःकरणे दुष्टाईने भरलेली आहेत आणि जिवंत असताना त्यांच्या अंतःकरणात वेडेपणा आहे आणि नंतर ते मृतांमध्ये सामील होतात.
जिवंत लोकांमध्ये असलेल्या प्रत्येकाला ही आशा आहे—जिवंत कुत्रा सुद्धा मृत सिंहांपेक्षा बरा!
जिवंतांना आपण मरणार हे माहीत असते, पण मेलेल्यांना काहीच माहीत नसते; त्यांना पुढे काही मोबदला नाही आणि त्यांच्या नावाचे सुद्धा स्मरण नाही.
त्यांचे प्रेम, त्यांचा द्वेष आणि त्यांचा हेवा हे सर्व फार पूर्वीच नाहीसे झाले आहे; सूर्याखाली घडत असलेल्या कोणत्याही गोष्टीत पुन्हा त्यांचा वाटा नसेल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options