उपदेशक ८:१५
आजूबाजूच्या संदर्भासह वचन १५ दाखवत आहे.
१२
जर एखादा दुष्ट मनुष्य शंभर गुन्हे करतो तरी तो दीर्घायुष्य जगतो, तरी मला माहीत आहे की जे परमेश्वराचे भय बाळगतात व जे त्यांचा आदर करतात त्यांचे अधिक हित होईल.
१३
दुष्ट परमेश्वराचे भय बाळगत नाहीत, म्हणून त्यांचे भले होणार नाही आणि संध्याकाळच्या सावलीप्रमाणे त्यांचे दिवस वाढणार नाही.
१४
पृथ्वीवर आणखी काही घडत आहे जे निरर्थक आहे: जे दुष्टासाठी निर्धारित असते ते नीतिमानाला मिळते व नीतिमानाच्या वाट्याचे दुष्टाला मिळते. मी म्हणतो हे सुद्धा अर्थहीन आहे.
१५
म्हणून मी जीवनाच्या आनंदाची प्रशंसा केली, कारण मनुष्याने खावे, प्यावे, व आनंद करावा, सूर्याखाली त्याहून अधिक चांगले काही नाही. तेव्हा सूर्याखाली परमेश्वराने दिलेल्या त्यांच्या कष्टदायक जीवनाच्या सर्व दिवसात, त्यांना आनंदाची साथ लाभेल.
१६
सुज्ञानाला जाणावे व पृथ्वीवर केलेले परिश्रम पाहावे—लोक जे अहोरात्र झोप न घेता करतात—म्हणून मी माझे चित्त लावले,
१७
तेव्हा मी परमेश्वराने केलेले सर्वकाही पाहिले. सूर्याखाली होणार्या कार्याला कोणीही समजू शकत नाही. शोध घेण्याचे कितीही प्रयत्न केले, तरीही त्याचा अर्थ कळू शकत नाही. जरी सुज्ञ लोक ते माहीत असल्याचा दावा करतात, तरी त्यांनाही ते खचितच समजू शकत नाही.
Settings