Skip to content
उपदेशक ४:१

उपदेशक ४:१

आजूबाजूच्या संदर्भासह वचन दाखवत आहे.
मी पुन्हा पाहिले आणि मला सूर्याखाली होत असलेला जुलूम दिसला: पीडितांचे अश्रू मी पाहिले— आणि त्यांचे सांत्वन करणारा असा कोणी नाही. छळ करणार्‍यांच्या हाती अधिकार होते— आणि त्यांचे सांत्वन करणारे कोणी नव्हते.
यावरून मी घोषित केले, मृत असलेल्या व्यक्ती, जिवंत असलेल्या माणसांपेक्षा अधिक संतुष्ट आहेत.
परंतु त्या दोघांपेक्षाही जो जन्मालाच आला नाही तो अधिक बरा. सूर्याखाली असलेले जे वाईट ते त्यांच्या पाहण्यात आले नाही.
आणि मी हे पाहिले की, एखाद्याला दुसर्‍याविषयी असलेल्या मत्सराच्या भावनेतून कष्ट आणि सर्व यश संपादन करता येते. हे सुद्धा व्यर्थच आहे, वार्‍यामागे धावल्यासारखे आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options