Skip to content
उपदेशक ३:१-१०

उपदेशक ३:१-१०

प्रत्येक गोष्टींसाठी निश्चित वेळ आहे, आणि पृथ्वीवर प्रत्येक कामासाठी एक ऋतू ठरलेला असतो:
जन्म होण्याची वेळ आणि मृत्यू येण्याची वेळ, पेरणीची वेळ आणि कापणीची वेळ,
ठार मारण्याची वेळ आणि बरे करण्याची वेळ आहे; विध्वंसाची वेळ आणि बांधण्याची वेळ आहे;
रडण्याची वेळ आणि हसण्याची वेळ आहे; शोक करण्याची आणि नाचण्याची वेळ आहे;
दगड पसरून टाकण्याची वेळ आणि दगड गोळा करण्याची वेळ; आलिंगन देण्याची वेळ व आलिंगन टाळण्याची वेळ;
शोधण्याची वेळ आणि सोडण्याची वेळ; साठविण्याची वेळ व टाकून देण्याची वेळ;
फाडण्याची वेळ व दुरुस्त करण्याची वेळ; मौन धरण्याची वेळ व बोलण्याची वेळ;
प्रेम करण्याची वेळ व द्वेष करण्याची वेळ; युद्ध करण्याची वेळ आणि शांती राखण्याची वेळ.
कामकर्‍यांना त्यांच्या कष्टापासून काय मोबदला मिळतो?
१०
परमेश्वराने मनुष्यावर लादलेले ओझे मी पाहिले आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options