उपदेशक ३:११-१५
११
त्यांनी प्रत्येक गोष्ट, त्याच्या समयात सुंदर अशी बनविली आहे. परमेश्वराने मनुष्याच्या अंतःकरणात अनंतकाळचे जीवन ठेवलेले आहे. तरीसुद्धा परमेश्वराने आरंभापासून शेवटपर्यंत केलेली कृत्ये कोणीही समजू शकले नाहीत.
१२
मला ठाऊक आहे की जिवंत असेपर्यंत मनुष्याने सुखी राहावे आणि दुसर्याचे हित करावे, यापेक्षा काहीही उत्तम नाही.
१३
प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपल्या कष्टाच्या कार्यात संतुष्ट राहावे—हे परमेश्वराने दिलेले दान आहे.
१४
मला हे माहीत आहे की परमेश्वराने जे केले ते सर्वकाळ टिकणारे आहे; त्यात काही भर घालता येणार नाही किंवा त्यातून काही काढून घेता येणार नाही. मनुष्याने त्यांचे भय धरावे म्हणून परमेश्वर हे सर्व करतात.
१५
जे आहे, ते सर्व यापूर्वी झालेलेच आहे; जे होणार, तेही होऊन गेले आहे. गतकाळात होऊन गेले तेच परमेश्वर पुन्हा घडवून आणतील.
Settings