उपदेशक ११:१-६
१
तू आपल्या धान्याची समुद्रावरून निर्यात कर; पुष्कळ दिवसांनी त्याचा मोबदला तुला लाभेल.
२
सात उपक्रमांमध्ये, होय, आठांमध्ये गुंतवणूक कर; कारण पृथ्वीवर कोणती दुर्घटना घडेल, हे तुला ठाऊक नाही.
३
जर मेघ पाण्याने भरलेले आहेत, तर ते पृथ्वीवर पाऊस ओततात. झाड दक्षिणेला पडो की उत्तरेला, ज्या ठिकाणी ते पडते, तिथेच पडलेले राहते.
४
जो वार्याकडे पाहत राहतो तो पेरणी करणार नाही आणि जो ढगांना पाहत राहतो तो कापणी करत नाही.
५
जसे वार्याचे मार्ग, किंवा आईच्या उदरात गर्भ कसा वाढतो हे तुला कळत नाही, तसेच परमेश्वर जे सर्वांचे निर्माणकर्ता आहेत, त्यांची कृत्येही तुला समजू शकत नाहीत.
६
तू आपले बी सकाळी पेर, आणि संध्याकाळीही आपल्या हातांना विसावा देऊ नकोस. कारण त्यातील कोणते फलदायी होईल, हे किंवा ते, किंवा ते दोन्हीही चांगले फळ देतील, हे तुला ठाऊक नाही.
Settings