Skip to content
उपदेशक १०:१६-२०

उपदेशक १०:१६-२०

१६
धिक्कार असो त्या देशाचा ज्याचा राजा एक दास आहे, आणि ज्या देशाचे राजपुत्र सकाळीच मेजवानी सुरू करतात.
१७
धन्य आहे तो देश ज्याचा राजा उच्चकुळात जन्मलेला आहे आणि ज्या देशाचे राजपुत्र नशेसाठी नव्हे तर शक्तीसाठी योग्य समयी आपले भोजन करतात.
१८
आळशीपणामुळे घराचे छत पडते; आळशाच्या हातांमुळे घर गळू लागते.
१९
मनोरंजनासाठी मेजवानी असते, द्राक्षारस जीवनाला आनंदित बनविते, आणि पैशाने सर्व समस्याचे समाधान होते.
२०
राजाला आपल्या मनात देखील शाप देऊ नको, श्रीमंताला सुद्धा आपल्या शयनकक्षातून शाप देऊ नकोस, कारण आकाशातील एक पक्षी तुझे शब्द घेऊन जाईल, आणि आपल्या पंखाने उडत जाऊन तू काय बोललास याचा अहवाल देईल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options