उपदेशक १०:१२-१५
१२
सुज्ञ व्यक्तीच्या मुखातील शब्द कृपेचे असतात, पण मूर्खाचे ओठ त्याचाच नाश करतात.
१३
त्यांचे बोलणे प्रथम मूर्खतेचे असते; आणि त्यांच्या बोलण्याचा शेवट दुष्टाईच्या वेडेपणाने होतो;
१४
मूर्ख शब्द वाढवून बोलतात. पुढे काय घडणार ते कोणी जाणत नाही; त्यांच्यानंतर काय होणार असे एखाद्याला कोणी व्यक्ती सांगू शकणार काय?
१५
मूर्खांचे श्रम त्यांना थकवून टाकतात; नगराकडे जाणारी वाट त्यांना ठाऊक नसते.
Settings