मुख्य मजकुरावर जा
अनुवाद ५:२९-३३

देव इस्राएलच्या हेतूची प्रशंसा करतो

अनुवाद ५:२९-३३
२९
त्यांचे अंतःकरण मजविषयी नेहमीच असे राहिले आणि माझ्या आज्ञा पाळण्याचे भय त्यांच्याठायी नेहमीच राहिले तर किती बरे होईल! असे झाल्यास त्यांचे व त्यांच्या मुलाबाळांचे सदासर्वकाळ कल्याण होईल!
३०
“जा आणि त्यांना त्यांच्या तंबूमध्ये परत जाण्यास सांग.
३१
पण तू माझ्याबरोबर इथेच थांब, म्हणजे मी तुला माझ्या सर्व आज्ञा, विधी व नियम देईन आणि ते त्यांना शिकव म्हणजे जो देश मी त्यांना वतन म्हणून देणार आहे तिथे त्यांचे पालन करावे.”
३२
याहवेह तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा पाळण्याची तुम्ही खबरदारी घ्या; उजवीकडे किंवा डावीकडे वळू नका.
३३
याहवेह तुमच्या परमेश्वराने ज्या मार्गावर चालण्यास आज्ञा केली आहे, त्यावर तुम्ही चला, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल आणि ज्या देशाचा तुम्ही ताबा घेणार आहात, त्या देशात तुम्ही दीर्घकाल समृद्धीचे जीवन जगू शकाल.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options