Skip to content
अनुवाद ४:१६-२४

अनुवाद ४:१६-२४

१६
म्हणून कोणत्याही पुरुष अथवा स्त्रीच्या आकाराची कोरीव मूर्ती करून तुम्ही स्वतःला भ्रष्ट करू नये,
१७
किंवा पृथ्वीवरील एखाद्या पशूची किंवा आकाशात उडणार्‍या कोणत्याही पक्ष्याची,
१८
अथवा जमिनीवर रांगणार्‍या कोणत्याही प्राण्याची किंवा पृथ्वीच्या खाली जलामध्ये असणार्‍या कोणत्याही मत्स्याची तुम्ही प्रतिमा करू नये.
१९
जेव्हा तुम्ही वर आकाशाकडे बघाल आणि तुम्हाला सूर्य, चंद्र व तारे—आकाशातील सर्व नक्षत्र—दिसतील, तेव्हा त्यांची उपासना करण्याच्या आणि त्यांना दंडवत घालण्याच्या मोहात पडू नका. याहवेह तुमच्या परमेश्वराने आकाशाखाली असलेल्या पृथ्वीतलावरील इतर राष्ट्रांना ते वाटून दिले आहेत.
२०
परंतु याहवेहने तुम्हाला इजिप्तच्या तप्त लोखंडी भट्टीतून यासाठी सोडवून आणले की, तुम्ही त्यांचे खास निवडलेले लोक, त्यांचे वारसदार व्हावे, जसे तुम्ही आज आहात.
२१
पण तुमच्यामुळेच याहवेह माझ्यावर रागावले होते. त्यांनी मला शपथपूर्वक सांगितले आणि याहवेह तुमच्या परमेश्वरांनी वतनादाखल दिलेल्या त्या उत्तम देशात यार्देन ओलांडून तुला जाता येणार नाही.
२२
तुला याच देशात मरावे लागणार; मी यार्देन पार करू शकणार नाही; परंतु तुम्ही मात्र पार करून तो उत्तम प्रदेश वतन म्हणून ताब्यात घ्याल.
२३
तेव्हा सावधगिरी बाळगा, नाहीतर याहवेह तुमच्या परमेश्वराने मनाई केलेल्या वस्तूंची तुम्ही स्वतःसाठी कोरीव प्रतिमा कराल आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या कराराचे तुम्हाला विस्मरण होईल.
२४
कारण याहवेह तुमचे परमेश्वर भस्म करणारे अग्नी व ईर्ष्यावान असे परमेश्वर आहेत.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options