अनुवाद ३१:२७-३०
२७
कारण तुम्ही किती बंडखोर आणि ताठ मानेचे आहात हे मला माहीत आहे. मी तुम्हाबरोबर असताना, तुम्ही जर याहवेहविरुद्ध बंडखोरी करीत आहात, तर माझ्या मृत्यूनंतर तुम्ही किती अधिक बंडखोरी कराल!
२८
आता तुमच्या गोत्रांच्या सर्व वडीलजनास आणि अधिकार्यांस माझ्यासमोर एकत्र करा, म्हणजे मी हे वचने त्यांच्या कानावर पडतील असे बोलेन व आकाश आणि पृथ्वी यांना त्यांच्याविरुद्ध साक्ष बनवेल.
२९
कारण मला माहीत आहे की, माझ्या मृत्यूनंतर तुम्ही स्वतःला पूर्णपणे भ्रष्ट कराल आणि मी दिलेल्या आज्ञांपासून बहकून दूर जाल. भविष्यकाळात तुमच्यावर संकटे येतील, कारण याहवेहच्या दृष्टीने वाईट ते कराल व तुमच्या हस्तकृतीने त्यांना अतिशय संतप्त कराल.”
३०
आणि मोशेने या गीताचे शब्द प्रारंभापासून तर शेवटपर्यंत जमलेल्या इस्राएली लोकांच्या सर्व मंडळीच्या कानी पडतील असे सांगितले.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings