Skip to content
दानीएल ८:३-१४

दानीएल ८:३-१४

मी आपले डोळे वर करून पाहिले की नदीच्या काठावर उभा असलेला एक मेंढा दिसला, त्याला दोन शिंगे होती आणि ती शिंगे लांब होती. एक शिंग दुसर्‍यापेक्षा अधिक लांब होते परंतु नंतर ते वाढले.
मी पाहिले की तो मेंढा पश्चिमेकडे, उत्तरेकडे, आणि दक्षिणेकडे धडक मारीत होता. दुसर्‍या कोणताही प्राणी त्याच्यासमोर उभा राहू शकला नाही आणि त्याच्या सामर्थ्यापासून वाचू शकला नाही. त्याला ज्यात संतोष वाटला, ते त्याने केले आणि तो महान झाला.
जेव्हा मी याचा विचार करीत होतो, तेव्हा मी पाहिले की एक बोकड त्याचे पाय जमिनीवर ठरत नव्हते, जो सर्व पृथ्वीला पार करून आला. या बोकडाला डोळ्यांच्या मधोमध एक ठळक शिंग होते.
तो दोन शिंगे असलेल्या मेंढ्याजवळ आला जो नदीसमोर उभा होता आणि पूर्णशक्तीने त्याने त्यावर हल्ला केला.
मी पाहिले की त्याने फार क्रोधित होऊन मेंढ्यावर हल्ला केला आणि धडक देत त्याचा दोन्ही शिंगांना मोडून टाकले. मेंढा त्याच्या विरोधात उभा राहण्यास शक्तिहीन होता; बोकडाने त्याला जमिनीवर आपटले आणि पायाखाली तुडविले आणि त्याच्या शक्तीपासून मेंढ्याला कोणालाही सोडविता आले नाही.
तो बोकड फार महान झाला, परंतु तो बलिष्ठ झाल्यामुळे त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्या शिंगाच्या जागी चार ठळक शिंगे फुटली. त्यांची टोके चारही दिशांनी वाढली.
त्यांच्यापैकी एकामधून दुसरे शिंग फुटले, लहान म्हणून त्याचा प्रारंभ झाला, परंतु दक्षिण, पूर्व आणि वैभवी देशाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात वाढले.
१०
तो आकाशाच्या सैन्यापर्यंत पोहोचेपर्यंत वाढला आणि त्याने काही ताऱ्यांचे सैन्य पृथ्वीवर फेकले आणि त्यांना तुडविले.
११
त्याने स्वतःला याहवेहच्या अधिपतीप्रमाणे उच्च केले; त्याने दररोज याहवेहला अर्पण केले जाणारे यज्ञ काढून घेतले आणि त्यांचे पवित्रस्थान पाडून टाकले.
१२
दैनंदिन यज्ञ बंडखोरीमुळे याहवेहचे लोक त्याच्या हाती देण्यात आले. त्याने जे काही केले त्यात उन्नती केली आणि सत्य मातीला मिळविले.
१३
नंतर एका पवित्रजनाला बोलताना मी ऐकले आणि दुसरा पवित्रजन त्याला म्हणाला, “दृष्टान्त पूर्ण होण्यास किती काळ लागेल—त्या दृष्टान्तामध्ये रोजचे अर्पण, विध्वंसक पातक ज्यामुळे ओसाडी येते, पवित्रस्थानाचे समर्पण आणि याहवेहच्या लोकांना पायदळी तुडविले जाणे हे दाखविले आहे?”
१४
तो मला म्हणाला, “यासाठी 2,300 संध्याकाळ आणि सकाळ लागतील; नंतर पवित्रस्थान शुद्ध करण्यात येईल.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options