दानीएल ४:६
आजूबाजूच्या संदर्भासह वचन ६ दाखवत आहे.
३
किती महान त्यांनी प्रकट केलेली चिन्हे,
४
मी नबुखद्नेस्सर आपल्या महालात शांतीने, संतुष्टीचे आणि समृद्धीचे जीवन जगत होतो.
५
मी एक स्वप्न पाहिले, जेव्हा मी माझ्या बिछान्यावर निजलेला होतो, ते चित्र आणि दृष्टान्त जे माझ्या मनात आले, त्यामुळे मी अतिशय भयभीत झालो.
६
माझ्या स्वप्नाचा अर्थ काय ते कळावे या हेतूने मी बाबेलमधील सर्व ज्ञानी लोकांना आज्ञा दिली.
७
जेव्हा जादूगार, मांत्रिक, ज्योतिषी, दैवप्रश्न सांगणारे आले, तेव्हा मी त्यांना माझे स्वप्न सांगितले, पण ते मला त्याचा अर्थ सांगू शकले नाही.
८
अखेरीस दानीएल माझ्या उपस्थितीत आला आणि मी त्याला माझे स्वप्न सांगितले. (माझ्या देवाच्या नावावरून मी त्याचे बेलटशास्सर असे नाव ठेवले होते. याच माणसामध्ये पवित्र देवाचा आत्मा आहे.)
९
मी म्हणालो, “हे बेलटशास्सर, धुरंधर जादुगारा, पवित्र देवाचा आत्मा तुझ्यामध्ये आहे हे मला ठाऊक आहे आणि तुझ्यासाठी कोणतेच रहस्य कठीण नाही. माझे हे स्वप्न आहे; मला त्याचा अर्थ सांग.
Settings