दानीएल ११:३०-३२
३०
पश्चिमेकडील कित्तीम बेटांतील जहाजे त्याला विरोध करतील आणि त्याचे धैर्य तुटेल. मग तो पवित्र करारावर आपला रोष काढण्यासाठी परत येईल. तो परत येईल आणि पवित्र कराराचा त्याग करणार्यांवर कृपा दाखवेल.
३१
“त्याचे सशस्त्र सैन्य मंदिराच्या दुर्गास अपवित्र करण्यासाठी पुढे येतील आणि दैनंदिन होमार्पण बंद केले जाईल. मग ते ओसाड करणारा अमंगळ पदार्थ स्थापतील.
३२
जे कराराविरुद्ध दुष्टता करतात, त्यांना तो खुशामत करून भ्रष्ट करेल, पण ज्यांना त्यांचा परमेश्वर माहीत आहे ते त्याला खात्रीने सामोरे जातील.
Settings