आमोस ६:८-१४
८
सार्वभौम याहवेहनी स्वतः शपथ घेतली आहे—याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर घोषणा करतात: “याकोबाच्या गर्वाचा मी तिरस्कार करतो आणि त्यांचे किल्ले मी घृणास्पद मानतो; मी या शहराला आणि तिच्यातील सर्वकाही शत्रूंच्या हाती देईन.”
९
जर एका घरात फक्त दहाच लोक उरले असले तरीही ते सर्व मरतील.
१०
आणि मृतदेह जाळण्यासाठी घरातून बाहेर काढायला आलेल्या त्याच्या नातेवाईकांनी तिथे लपून बसलेल्या कोणाला विचारले तर तुझ्यासोबत आणखी कोणी आहे काय? आणि तो म्हणेल, “नाही,” तो त्याला पुढे म्हणेल, “गप्प राहा, याहवेहचे नाव घेऊ नको.”
११
कारण याहवेहने अशी आज्ञा दिली आहे, आणि ते मोठ्या घरांचे तुकडे तुकडे आणि लहान घरांना चक्काचूर करतील.
१२
घोडे खडकाळ कडांवर पळतात काय? बैल घेऊन कोणी समुद्र नांगरतो काय? पण तुम्ही न्यायाला विषामध्ये आणि नीतिमत्तेच्या फळाला कडवटपणामध्ये बदलले आहे;
१३
लो-देबारला आपल्या ताब्यात घेण्यात तुम्ही आनंद मानता आणि म्हणता, “आम्ही स्वतःच्या बळाने करनाईम घेतला नाही काय?”
१४
याहवेह, सर्वसमर्थ परमेश्वर जाहीर करतात, “हे इस्राएला, मी तुझ्याविरुद्ध एक राष्ट्र उठवेन, लेबो हमाथपासून अराबाच्या ओहोळापर्यंत ते तुझ्यावर जुलूम करेल.”
Settings