मुख्य मजकुरावर जा
आमोस २:६-८

सामाजिक अन्यायाबद्दल इस्राएलावर न्याय

आमोस २:६-८
याहवेह असे म्हणतात, “इस्राएलला तीन नव्हे तर चार अपराधांसाठी शासन करण्यापासून मी अनुताप करणार नाही. चांदीसाठी ते एका न्यायी व्यक्तीला, आणि पायातील एका जोड्यासाठी गरजवंत व्यक्तीला विकतात.
ते गरिबांच्या डोक्याला भूमिवरील धुळीत पायदळी तुडवितात आणि दीनदुबळ्यांचा न्याय करीत नाही. मुलगा व पिता एकाच तरुणीकडे जाऊन माझ्या पवित्र नामाला काळिमा लावतात.
प्रत्येक वेदीजवळ गहाण ठेवलेल्या वस्त्रांवर पडून राहतात आणि आपल्या दैवतांच्या घरात दंड म्हणून घेतलेला द्राक्षारस पितात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options