Skip to content
प्रेषित ८:५-१३

फिलिप्प समरियेत उपदेश करतो

प्रेषित ८:५-१३
फिलिप्प खाली शोमरोनातील एका शहरात गेला आणि त्याने ख्रिस्ताबद्दल घोषणा केली.
ज्यावेळी समुदायाने फिलिप्पाचे ऐकले व त्याने केलेली चिन्हे पाहिली, सर्वांनी त्याच्या म्हणण्याकडे बारकाईने लक्ष दिले.
अनेक अशुद्ध आत्मे किंकाळी मारून निघून जात आणि अनेक पक्षघाती व पांगळे लोक बरे होत असत.
त्या शहरात मोठा आनंद झाला होता.
आता काही काळापर्यंत शिमोन नावाचा एक मनुष्य जादूटोणा करीत होता आणि त्याने शोमरोन शहरातील लोकांना चकित करून सोडले होते व तो आपण कोणी फार मोठे आहोत अशी फुशारकी मारीत असे.
१०
म्हणून सर्व उच्च व नीच लोक त्याच्याकडे लक्ष देत होते व जिला “परमेश्वराची महाशक्ती म्हणतात तो खरोखर हाच मनुष्य असला पाहिजे,” असे उद्गार काढीत होते.
११
ते त्याच्यामागे जात होते कारण बराच काळापासून जादूटोणा करून त्याने त्यांना थक्क केले होते.
१२
परंतु जेव्हा लोकांनी परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता व येशू ख्रिस्ताचे नाव याबद्दलचा संदेश फिलिप्पाकडून ऐकला आणि त्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पुरुषांना व स्त्रियांना दोघांनाही बाप्तिस्मा देण्यात आला.
१३
शिमोनाने देखील विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाला. आता फिलिप्प जिथे जात असे तिथे तो त्याच्यामागे जाऊ लागला आणि चमत्कार व चिन्हे पाहून तो आश्चर्य करू लागला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options