मुख्य मजकुरावर जा
प्रेषित ७:२-८

अब्राहामाशी देवाचा करार

प्रेषित ७:२-८
स्तेफनाने त्यावर असे उत्तर दिले: “बंधुजनहो व वडिलांनो, माझे ऐका! आपला पिता अब्राहाम हारानात जाऊन राहण्यापूर्वी मेसोपोटामिया देशात असताना गौरवशाली परमेश्वर त्याला प्रकट झाले.
परमेश्वर त्याला म्हणाले, ‘तू आपला देश व आपले लोक सोड आणि मी दाखवेन त्या देशात जा.’
“तेव्हा त्याने खाल्डियनांचा देश सोडला आणि तो हारान येथे राहिला. त्याच्या पित्याच्या मृत्यूनंतर, परमेश्वराने त्याला तुम्ही सध्या राहत आहात त्या भूमीत पाठविले.
परमेश्वराने त्याला येथेही वतन दिले नाही, पाऊल पडेल एवढी जमीनदेखील दिली नाही. परंतु त्यावेळी अब्राहामाला मूलबाळ नव्हते, तरी परमेश्वराने त्याला असे अभिवचन दिले की, हा देश त्याला आणि त्याच्या नंतरच्या संततीला वतन म्हणून दिला जाईल.
परमेश्वर त्याच्याशी अशा रीतीने बोलले: ‘तुझे वंशज, जो देश त्यांचा स्वतःचा नाही अशा देशात परके गुलाम म्हणून राहतील व त्यांना चारशे वर्षे बंदिस्त करून अन्यायाने वागविले जाईल.
परंतु ज्या राष्ट्रात त्यांनी गुलाम म्हणून सेवा केली त्याला मी शिक्षा करेन,’ असे परमेश्वराने म्हटले, ‘आणि शेवटी त्या देशातून ते बाहेर येतील आणि या ठिकाणी माझी उपासना करतील.’
नंतर परमेश्वराने अब्राहामाला, सुंतेचा करार दिला आणि अब्राहाम इसहाकाचा पिता झाला आणि तो आठ दिवसांचा असतानाच त्याची सुंता झाली. पुढे इसहाक हा याकोबाचा पिता झाला आणि याकोब हा बारा पूर्वजांचा पिता झाला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options