मुख्य मजकुरावर जा
प्रेषित ३:१२-१६

पेत्र शलमोनाच्या देवडीमध्ये उपदेश करतो

प्रेषित ३:१२-१६
१२
हे पाहून पेत्र त्या जमावाला म्हणाला: “अहो इस्राएली लोकांनो, याबद्दल आश्चर्य वाटण्याचे काही कारण आहे का? आमच्याच शक्तीने किंवा सुभक्तीने या मनुष्याला चालावयास लावले आहे, अशा अर्थाने तुम्ही आम्हाकडे का पाहत आहात?
१३
अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचे परमेश्वर, जे आपल्या पूर्वजांचे परमेश्वर आहेत, त्यांनी त्यांचा सेवक येशूंना गौरविले आहे. त्याच येशूंना मारून टाकले जावे यासाठी तुम्ही त्यांना धरून दिले आणि पिलातासमोर तुम्ही त्यांना नाकारले. जरी पिलाताने त्यांना सोडून देण्याचा निश्चय केला होता,
१४
तरी तुम्ही पवित्र व नीतिमानाशी संबंध ठेवण्यास नकार दिला व त्याऐवजी एका खुनी माणसाच्या मुक्ततेची मागणी केली.
१५
तुम्ही प्रत्यक्ष जीवनाच्या निर्माणकर्त्यालाच जिवे मारले, परंतु परमेश्वराने त्यांना मरणातून पुन्हा उठविले, याचे आम्ही साक्षी आहोत.
१६
येशूंच्या नावावरील विश्वासामुळे हा मनुष्य ज्याला आपण पाहता व ओळखता तो आता बलवान झाला आहे. येशूंच्या नावावरील विश्वासाद्वारे तो पूर्ण बरा झालेला आहे, हे तुम्ही सर्वजण पाहतच आहात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options