Skip to content
प्रेषित २४:२-८

प्रेषित २४:२-८

पौलाला आत बोलाविण्यात आले, तेव्हा तिर्तुल्लसाने त्याचे आरोपपत्र फेलिक्ससमोर सादर केले: “आपल्या कारकिर्दीत आम्हास: दीर्घकाल शांती लाभलेली आहे आणि तुमच्या दूरदृष्टीमुळे आमच्या देशात समाज सुधारणा झाल्या आहेत.
यामुळे आम्ही सर्वठिकाणी आणि प्रत्येक प्रकारे कृतज्ञतेने व मनापासून स्वागत करतो आणि श्रेष्ठ फेलिक्स आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत.
आपणास कंटाळा येणार नाही अशा रीतीने, मी माझे म्हणणे आपणापुढे मांडणार आहे, तेव्हा कृपा करून आपण माझे भाषण ऐकून घ्यावे, अशी आपणास विनंती आहे.
“हा मनुष्य त्रासदायक असल्याचे आम्हास आढळून आले आहे तो अवघ्या जगातील सर्व यहूदीयांना बंड करण्यास चिथावीत असतो. नासरेथकर पंथाचा हा पुढारी आहे
हा मंदिर अपवित्र करण्याचा प्रयत्न करीत होता; म्हणून आम्ही त्याला अटक केली. आम्ही आमच्या नियमानुसार त्याचा न्याय करणार होतो
परंतु यरुशलेम येथील पलटणीचे सेनापती लुसिया आले आणि त्यांनी जबरदस्ती करून त्याला आमच्या हातातून काढून घेतले
व आज्ञा केली की त्याच्यावर आरोप करणार्‍यांनी तुमच्यासमोर यावे. आता या माणसाची आपण स्वतः चौकशी करून या आरोपात तथ्य आहे की नाही, हे समजून घ्यावे.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options