प्रेषित २४:१-९
१
पाच दिवसानंतर महायाजक हनन्याह काही वडीलजनांसह तिर्तुल्लस नावाच्या वकीलास बरोबर घेऊन कैसरीयाला गेले आणि त्यांनी पौलाविरुद्ध केलेले त्यांचे आरोप राज्यपालापुढे सादर केले.
२
पौलाला आत बोलाविण्यात आले, तेव्हा तिर्तुल्लसाने त्याचे आरोपपत्र फेलिक्ससमोर सादर केले: “आपल्या कारकिर्दीत आम्हास: दीर्घकाल शांती लाभलेली आहे आणि तुमच्या दूरदृष्टीमुळे आमच्या देशात समाज सुधारणा झाल्या आहेत.
३
यामुळे आम्ही सर्वठिकाणी आणि प्रत्येक प्रकारे कृतज्ञतेने व मनापासून स्वागत करतो आणि श्रेष्ठ फेलिक्स आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत.
४
आपणास कंटाळा येणार नाही अशा रीतीने, मी माझे म्हणणे आपणापुढे मांडणार आहे, तेव्हा कृपा करून आपण माझे भाषण ऐकून घ्यावे, अशी आपणास विनंती आहे.
५
“हा मनुष्य त्रासदायक असल्याचे आम्हास आढळून आले आहे तो अवघ्या जगातील सर्व यहूदीयांना बंड करण्यास चिथावीत असतो. नासरेथकर पंथाचा हा पुढारी आहे
६
हा मंदिर अपवित्र करण्याचा प्रयत्न करीत होता; म्हणून आम्ही त्याला अटक केली. आम्ही आमच्या नियमानुसार त्याचा न्याय करणार होतो
७
परंतु यरुशलेम येथील पलटणीचे सेनापती लुसिया आले आणि त्यांनी जबरदस्ती करून त्याला आमच्या हातातून काढून घेतले
८
व आज्ञा केली की त्याच्यावर आरोप करणार्यांनी तुमच्यासमोर यावे. आता या माणसाची आपण स्वतः चौकशी करून या आरोपात तथ्य आहे की नाही, हे समजून घ्यावे.”
९
त्याचे बोलणे संपताच सर्व यहूद्यांनी एकसुरात अनुमोदन दिले की सांगण्यात आलेली प्रत्येक गोष्ट सत्य आहे.
Settings