Skip to content
प्रेषित २४:११-१५

प्रेषित २४:११-१५

११
मंदिरामध्ये उपासना करण्यासाठी मी यरुशलेममध्ये आलो याला बारा दिवसांहून अधिक कालावधी लोटला नाही, हे आपण सहज पडताळून पाहू शकाल.
१२
आणि मंदिरात, सभागृहामध्ये किंवा शहरात कोणाबरोबर वादविवाद करताना किंवा लोकात अशांती माजविताना मजवर आरोप करणार्‍यांना मी आढळलो नाही.
१३
त्यांनी जे आरोप मजवर केले आहेत ते तुम्हाला सिद्ध करून दाखवू शकत नाहीत.
१४
तरी एक गोष्ट कबूल करतो की मी आपल्या पूर्वजांच्या परमेश्वराची उपासना करतो व त्या मार्गाचा अनुयायी आहे ज्याला हे लोक पंथ असे म्हणतात. त्याबरोबरच जे नियमशास्त्राला धरून आहे त्या प्रत्येक गोष्‍टीवर व संदेष्ट्यांच्या लिखाणात जे लिहिले आहे, त्या प्रत्येक वचनावर माझा विश्वास आहे,
१५
परमेश्वरामध्ये या लोकांची जी आशा आहे तीच माझीसुद्धा आहे, ती ही की नीतिमान व अनीतिमान या दोघांचेही पुनरुत्थान होईल.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options