Skip to content
प्रेषित २१:२३-२६

प्रेषित २१:२३-२६

२३
तेव्हा आम्ही सांगतो ते कर. नवस केलेले असे आमच्यात चौघेजण आहेत.
२४
तर तू या माणसांना घेऊन शुद्धीकरणाचा विधी पूर्ण कर आणि त्यांच्या मुंडणाचा खर्च कर, म्हणजे ते त्यांच्या डोक्यांचे मुंडण करू शकतील व प्रत्येकाला समजेल की तू स्वतःसुद्धा नियमशास्त्र पाळतोस आणि तुझ्याबद्दलच्या अहवालात जे सांगितलेले आहे, त्यात काही तथ्य नाही.
२५
गैरयहूदी विश्वासणार्‍यांबद्दल म्हणशील तर आम्ही आमचा निर्णय त्यांना लिहून कळविला आहे की त्यांनी मूर्तींना अर्पिलेले अन्न खाण्यापासून, रक्त सेवन करण्यापासून, गळा दाबून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाण्यापासून आणि वेश्यागमन यापासून स्वतःला दूर ठेवावे.”
२६
दुसर्‍या दिवशी पौलाने त्या माणसांना घेऊन त्यांच्याबरोबर स्वतःस शुद्ध करून घेतले. जेव्हा त्यांच्या शुद्धीकरणाच्या विधीचे दिवस समाप्त होतील आणि त्यांच्यातील प्रत्येकासाठी अर्पण करावे लागेल, त्या तारखेची सूचना देण्यासाठी तो मंदिरात गेला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options