Skip to content
प्रेषित १८:६-११

प्रेषित १८:६-११

परंतु जेव्हा ते पौलाला विरोध करून शिवीगाळ करू लागले, तेव्हा पौलाने याच्या निषेधार्थ त्याचे वस्त्र झटकून टाकले आणि म्हणाला, “तुमच्या विनाशासाठी तुम्हीच जबाबदार आहात! मी निर्दोष आहे. येथून पुढे मी गैरयहूदीयांकडे जाईन.”
नंतर पौल सभागृह सोडून तीतुस यूस्त नावाच्या माणसाच्या घरी गेला. तो परमेश्वराचा उपासक होता आणि सभागृहा शेजारीच राहत असे.
त्या सभागृहाचा प्रमुख क्रिस्प आणि त्याच्या कुटुंबातील सर्व लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला आणि करिंथमधील अनेकांनी पौलाचे ऐकून विश्वास ठेवला आणि त्यांचा बाप्तिस्मा झाला.
एके रात्री प्रभू पौलाशी दृष्टान्तात बोलला: “भिऊ नकोस; बोलत राहा, गप्प राहू नकोस.
१०
मी तुझ्याबरोबर आहे आणि कोणीही तुझ्यावर हल्ला वा तुला इजा करणार नाही, कारण या शहरात माझे अनेक लोक आहेत.”
११
तेव्हा पौल त्यांना करिंथ येथे दीड वर्ष परमेश्वराचे वचन शिकवीत राहिला.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options