Skip to content
प्रेषित १०:१७-२३

दर्शनाचा अर्थ व संदेशवाहकांची भेट

प्रेषित १०:१७-२३
१७
त्या दृष्टान्ताचा काय अर्थ असावा याविषयी पेत्र विचारात पडला असता, कर्नेल्याने पाठविलेल्या माणसांना शिमोनाचे घर सापडले आणि ती बाहेर दरवाजाजवळ येऊन उभी राहिली.
१८
त्यांनी हाक मारून अशी विचारणा केली, “शिमोन, ज्याला पेत्र असेही म्हणतात, येथेच राहत आहेत काय?”
१९
इकडे पेत्र त्या दृष्टान्ताविषयी विचार करीत असताना, आत्मा त्याला म्हणाला, “शिमोना, तीन माणसे तुला शोधत आहेत.
२०
म्हणून ऊठ आणि खाली जा. त्यांच्याबरोबर जाण्यास संकोच करू नको, कारण मीच त्यांना पाठविले आहे.”
२१
पेत्र खाली गेला आणि त्या माणसांना म्हणाला, “मी तोच आहे ज्याचा तुम्ही शोध घेत आहात. तुम्ही कशासाठी आला आहात?”
२२
त्या माणसांनी उत्तर दिले, “आम्ही कर्नेल्य शताधिपतीकडून आलो आहोत. ते नीतिमान आणि परमेश्वराला भिऊन वागणारे मनुष्य आहेत, सर्व यहूदी लोकांकडून सन्मानित झालेले आहेत. एका पवित्र दूताने त्यांना सांगितले की तुम्ही पेत्राला तुमच्या घरी बोलवावे म्हणजे तुमच्याकडील संदेश त्यांना ऐकता येईल”
२३
तेव्हा पेत्राने त्या माणसांना पाहुणे म्हणून घरात बोलाविले. दुसर्‍या दिवशी पेत्र त्यांच्याबरोबर निघाला, योप्पातील काही विश्वासणारे बंधूही त्याच्याबरोबर गेले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options