2 थेस्सलनीकाकरांस ३:६-८
६
प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने आज्ञा करतो की, जो प्रत्येक विश्वासणारा बंधू आळशी आणि फूट पाडणारा आणि आमच्याद्वारे जे शिक्षण मिळाले त्याप्रमाणे जीवन न जगणारा असल्यास त्यापासून दूर राहा.
७
कारण तुम्हाला आमचे अनुकरण कसे करावयाचे हे चांगले माहीत आहे. आम्ही तुम्हामध्ये राहत असताना आळशी नव्हतो.
८
आम्ही कोणाचेही अन्न विकत घेतल्याशिवाय खाल्ले नाही; याउलट, तुमच्यातील कोणावरही ओझे होऊ नये म्हणून आम्ही रात्रंदिवस परिश्रम आणि कष्ट केले.
Settings