2 शमुवेल २१:४-९
४
गिबोनी लोकांनी राजाला उत्तर दिले, “शौल आणि त्याच्या घराण्याकडून आम्ही चांदी किंवा सोन्याची मागणी करावी असा अधिकार आम्हाला नाही, किंवा इस्राएलातील कोणालाही जिवे मारण्याचा अधिकार आम्हाला नाही.” दावीदाने विचारले, “मग तुमच्यासाठी मी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?”
५
त्यांनी राजाला उत्तर दिले, “ज्या मनुष्याने आमचा नाश केला आणि आमची संख्या कमी व्हावी आणि इस्राएलमध्ये कुठेही आम्हाला स्थान नसावे म्हणून आमच्याविरुद्ध योजना केली,
६
तर आता त्याच्या वंशातील सात पुरुषांना आमच्याकडे द्यावे म्हणजे शौल जो याहवेहद्वारे निवडला गेला होता, त्याच्या गिबियाहमध्ये आम्ही त्यांना मारून टाकून त्यांची शरीर तिथे उघडे टाकू.” तेव्हा राजा म्हणाला, “मी त्यांना तुमच्या हाती देईन.”
७
शौलाचा पुत्र योनाथान व दावीदामध्ये याहवेहसमोर झालेल्या शपथेमुळे राजाने शौलाचा पुत्र योनाथान याचा पुत्र मेफीबोशेथ याची गय केली.
८
परंतु अय्याहची कन्या रिजपाह हिचे दोन पुत्र अरमोनी आणि मेफीबोशेथ जे तिला शौलापासून झाले होते, त्याबरोबर शौलाची कन्या मीखल हिचे पाच पुत्र जे तिला महोलाथी बारजिल्लईचा पुत्र अद्रीएल याच्यापासून झाले होते यांना राजाने घेतले.
९
त्याने त्यांना गिबोनी लोकांच्या हाती सोपवून दिले, ज्यांनी त्यांना मारून टाकले आणि त्यांची शरीरे डोंगरावर याहवेहसमोर प्रदर्शित केली. ते सातही जण एकत्र मरण पावले; हंगामाच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये त्यांना मारण्यात आले होते, जेव्हा जवाच्या हंगामाची सुरुवात झाली होती.
Settings