Skip to content
2 शमुवेल २:१८-२३

2 शमुवेल २:१८-२३

१८
जेरुइयाहचे हे तीन पुत्रः योआब, अबीशाई आणि असाहेल तिथे होते. असाहेल हरिणीसारखा चपळ पायाचा होता.
१९
असाहेलने अबनेरचा पाठलाग केला, त्याचा पाठलाग करताना तो उजवीकडे किंवा डावीकडे वळला नाही.
२०
अबनेरने मागे वळून पाहिले आणि विचारले, “तू असाहेल आहेस काय?” “होय, मी आहे,” त्याने उत्तर दिले.
२१
तेव्हा अबनेर त्याला म्हणाला, “उजवीकडे किंवा डावीकडे वळ; एखाद्या तरुण पुरुषाला पकड आणि त्याची शस्त्रे काढून घे.” परंतु असाहेल त्याचा पाठलाग करण्याचे थांबवेना.
२२
अबनेरने पुन्हा असाहेलला चेतावणी दिली, “माझा पाठलाग करण्याचे थांबव! मी तुला का मारून टाकावे? तुझा भाऊ योआब याला मी आपले तोंड कसे दाखवू?”
२३
परंतु असाहेलने पाठलाग करण्याचे थांबविण्यास नाकारले; तेव्हा अबनेरने त्याच्या भाल्याचा दांडा असाहेलच्या पोटात खुपसला आणि तो भाला त्याच्या पोटातून जाऊन पाठीतून बाहेर आला. तो पडला आणि तिथेच मरण पावला. आणि प्रत्येकजण जे तिथून येत होते, ते असाहेल पडून मेला होता, तिथे थांबले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options