मुख्य मजकुरावर जा
2 शमुवेल १७:१-४

अहीथोफेल त्वरित पाठलाग करण्याचा सल्ला देतो

2 शमुवेल १७:१-४
अहीथोफेल अबशालोमला म्हणाला, “आज रात्री दावीदाचा पाठलाग करण्यासाठी मला बारा हजार माणसे निवडून घेऊ दे.
जेव्हा तो थकलेला आणि दुर्बल असेल तेव्हा मी त्याच्यावर हल्ला करेन. मी त्याला भीतीचा धक्का देईन आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व लोक पळून जातील. मी केवळ राजावरच वार करेन
आणि सर्व लोकांना तुझ्याकडे परत आणेन. ज्या मनुष्याचे मरण तू इच्छितो, तो मेला म्हणजे सर्व लोक सुरक्षित परत येतील; कोणालाही हानी होणार नाही.”
अबशालोमला आणि इस्राएलच्या सर्व वडिलांना ही योजना चांगली वाटली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options