2 शमुवेल १४:२९-३१
२९
तेव्हा योआबाला राजाकडे पाठवावे म्हणून अबशालोमाने योआबाला बोलाविणे पाठवले, परंतु योआबाने त्याच्याकडे येण्यास नकार दिला. त्याने दुसर्यांदा बोलाविणे पाठवले, परंतु पुन्हा योआबाने येण्यास नकार दिला.
३०
तेव्हा अबशालोम आपल्या सेवकांस म्हणाला, “पाहा, योआबाचे शेत माझ्या शेताला लागून आहे, त्यात त्याने जव लावले आहे. जा आणि त्याला आग लावा.” त्याप्रमाणे अबशालोमच्या सेवकांनी शेताला आग लावली.
३१
नंतर योआब अबशालोमच्या घरी गेला, आणि त्याला म्हणाला, “तुझ्या सेवकांनी माझ्या शेताला का आग लावली?”
Settings