2 शमुवेल १३:१-७
१
काही काळानंतर, दावीदाचा पुत्र अम्नोन हा तामार, जी दावीदाचा पुत्र अबशालोमची सुंदर बहीण होती, तिच्या प्रेमात पडला.
२
अम्नोन त्याच्या बहिणीच्या प्रेमात इतका वेडा झाला की, तो आजारी पडला. तामार कुमारी होती आणि तिच्याशी काही करणे हे त्याला अशक्य होते.
३
दावीदाचा भाऊ शिमिआहचा पुत्र योनादाब अम्नोनाचा सल्लागार असून अतिशय धूर्त होता.
४
त्याने अम्नोनास विचारले, “तू जो राजाचा पुत्र असून दिवसेंदिवस असा क्षीण का दिसतोस? तू मला सांगणार नाहीस काय?” तेव्हा अम्नोन त्याला म्हणाला, “माझा भाऊ अबशालोम याची बहीण तामारवर मी प्रेम करतो.”
५
यहोनादाब म्हणाला, “तुझ्या पलंगावर जा आणि आजारी असल्याचे ढोंग कर, जेव्हा तुझे वडील तुला पाहायला येतील, तेव्हा त्यांना सांग, ‘माझी बहीण तामारने माझ्याकडे येऊन मला काहीतरी खावयास द्यावे. तिने ते भोजन माझ्या दृष्टीसमोर तयार करावे म्हणजे मी तिला पाहीन आणि नंतर ते तिच्या हातून खाईन.’ ”
६
तेव्हा अम्नोन पडून राहिला आणि आजारी असल्याचे ढोंग केले. जेव्हा राजा त्याच्या भेटीस आला, तेव्हा अम्नोन त्याला म्हणाला, “माझी बहीण तामार हिने येऊन माझ्या दृष्टीसमोर विशेष भाकरी बनविल्या तर मला आवडेल, म्हणजे त्या मी तिच्या हातून खाईन.”
७
दावीदाने राजवाड्यात तामारकडे निरोप पाठवला: “तुझा भाऊ अम्नोन याच्या घरी जा आणि त्याच्यासाठी भोजन तयार कर.”
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings