2 पेत्र २:६-९
६
पुढे येणार्या अनीतिमानास उदाहरण देण्यासाठी सदोम व गमोरा ही नगरे भस्म करून त्यांची राख केली व त्यांनी त्यांना विध्वंसाची शिक्षा केली.
७
त्यांनी अनीतिमान लोकांच्या कामातुर वर्तनास दुःखी झालेल्या नीतिमान लोटाची सुटका केली,
८
(कारण तो नीतिमान मनुष्य त्यांच्यामध्ये दिवसेंदिवस राहून त्यांची अधर्मी कृत्ये पाहून व ऐकून त्याचा नीतिमान जीव तीव्र दुःखी झाला होता.)
९
नीतिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे व अनीतिमान लोकांना शिक्षा भोगीत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते.
Settings