मुख्य मजकुरावर जा
2 पेत्र २:१७-२२

धर्मत्याग्यांची फसवणूक आणि नियती

2 पेत्र २:१७-२२
१७
हे लोक कोरड्या झर्‍यांसारखे, वादळाने उडविलेल्या ढगांसारखे आहेत. त्यांच्यासाठी काळाकुट्ट अंधार राखलेला आहे.
१८
कारण जेव्हा चुकीने वागणार्‍या लोकांमधून कोणी बाहेर पडले असतील, त्यांना हे लोक मूर्खपणाच्या, मोठ्या फुगीर गोष्टी बोलून आणि देहाच्या वासनांद्वारे कामातुरपणाने भुरळ घालतात.
१९
हे त्यांना स्वतंत्रतेचे वचन देतात जेव्हा ते स्वतःच दुष्टतेचे दास आहेत, कारण “लोक ज्याच्या अधिकारात आहेत, ते त्याचे दास आहेत.”
२०
प्रभू व तारणारा येशू ख्रिस्तांच्या ज्ञानाद्वारे जगाच्या भ्रष्टतेतून बाहेर पडल्यावर जर पुन्हा तिच्यात गुंतून तिच्या कह्यात गेले तर त्यांची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.
२१
नीतिमत्त्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरवणे यापेक्षा तो मार्ग त्यांना माहीत झालाच नसता, तर ते त्यांच्यासाठी बरे झाले असते.
२२
अशा लोकांसाठी या म्हणी खर्‍या आहेत: “कुत्रा त्याच्या ओकारीकडे परत जातो,” आणि “धुतलेली डुकरीण तिच्या चिखलात लोळण्यास परत जाते,” अशा म्हणींप्रमाणे त्यांची गत झालेली असते.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options