2 राजे ५:१६-१८
१६
तेव्हा संदेष्ट्याने उत्तर दिले, “ज्यांची मी सेवा करतो त्या जिवंत याहवेहची शपथ, मी काहीही स्वीकार करणार नाही.” आणि नामानाने त्याला फार आग्रह केला, पण त्याने नकार दिला.
१७
नामान म्हणाला, “तुम्हाला नजराणे नको असतील तर घेऊ नका, पण निदान माझ्यावर थोडी कृपा करा आणि बरोबर नेण्यासाठी मला दोन खेचरांवर लादून नेता येईल एवढी येथील माती तरी द्या, कारण येथून पुढे याहवेहशिवाय मी इतर कोणत्याही दैवताला कधीही होमार्पण किंवा यज्ञार्पण करणार नाही.
१८
मात्र एक गोष्टींसाठी याहवेहने आपल्या सेवकाला क्षमा करावी: माझा धनी, म्हणजे राजा, रिम्मोन मंदिरात नमन करण्यास जातात, त्यावेळी त्यांना माझ्या हाताच्या आधाराची गरज पडते आणि त्याच्याबरोबर मलाही नमन करावे लागते—जेव्हा मी रिम्मोन मंदिरात नमन करतो, तेव्हा याहवेहने आपल्या सेवकाला क्षमा करावी.”
Settings