2 राजे २३:२५-२७
२५
योशीयाह सारखा कोणीही राजा त्याच्या आधी व त्याच्यानंतर झाला नाही ज्याने याहवेहकडे वळून मोशेचे नियमशास्त्र पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने आणि पूर्णशक्तीने पाळले.
२६
इतके होऊनही यहूदीयाच्या विरुद्ध आलेला याहवेहचा महाक्रोध कमी झाला नव्हता, मनश्शेह राजाने जी दुष्टता केली होती त्यामुळे त्यांचा यहूदाहवरचा राग कमी झाला नाही.
२७
म्हणून याहवेहने म्हटले, “इस्राएलप्रमाणे मी यहूदीयालाही माझ्या उपस्थितीतून काढून टाकेन आणि मी स्वतः ज्या नगरीला निवडले होते त्या यरुशलेमचा आणि या मंदिराचाही ज्याबद्दल मी म्हटले होते, ‘तिथे माझे नाव राहील’ त्यांचा त्याग करेन.”
Settings