2 राजे ११:१२-१३
१२
मग यहोयादाने राजाच्या पुत्राला बाहेर आणले, त्याच्या शिरावर राजमुकुट ठेवला; त्याच्या हातामध्ये कराराची प्रत दिली आणि त्याला राजा म्हणून घोषित केले. मग त्यांनी त्याला अभिषेक केला आणि लोकांनी टाळ्या वाजविल्या व मोठ्याने जयघोष करून ते म्हणाले, “राजा चिरायू होवो!”
१३
जेव्हा अथल्याहने पहारेकर्यांचा आणि लोकांचा आवाज ऐकला, तेव्हा ती त्यांच्याकडे याहवेहच्या मंदिरात आली.
Settings