Skip to content
2 राजे ११:१०-१६

2 राजे ११:१०-१६

१०
याहवेहच्या मंदिरामधील दावीद राजाचे जे भाले व ढाली होत्या, त्या अधिकाऱ्यांच्या हाती दिल्या.
११
प्रत्येकाच्या हातात शस्त्र घेऊन पहारेकरी राजाभोवती; मंदिराच्या दक्षिणेकडून उत्तरेच्या बाजूपर्यंत; वेदीजवळ व मंदिराजवळ उभे राहिले.
१२
मग यहोयादाने राजाच्या पुत्राला बाहेर आणले, त्याच्या शिरावर राजमुकुट ठेवला; त्याच्या हातामध्ये कराराची प्रत दिली आणि त्याला राजा म्हणून घोषित केले. मग त्यांनी त्याला अभिषेक केला आणि लोकांनी टाळ्या वाजविल्या व मोठ्याने जयघोष करून ते म्हणाले, “राजा चिरायू होवो!”
१३
जेव्हा अथल्याहने पहारेकर्‍यांचा आणि लोकांचा आवाज ऐकला, तेव्हा ती त्यांच्याकडे याहवेहच्या मंदिरात आली.
१४
तिने बघितले की रीतीनुसार राजा खांबाजवळ उभा आहे. अधिकारी आणि कर्णेवादक हे राजाजवळ उभे होते आणि राष्ट्रातील सर्व लोक आनंद करीत कर्णे वाजवित होते. तेव्हा अथल्याहने आपली वस्त्रे फाडली आणि ओरडून म्हणाली, “फितुरी रे, फितुरी!”
१५
यहोयादा याजकाने नेमणूक केलेल्या शताधिपतीच्या सेनाधिकार्‍यांना आदेश दिला: “सैन्याच्या रांगेतून तिला बाहेर काढा आणि जो कोणी तिच्यामागे जाईल त्याला तलवारीने मारा.” याजकाने म्हटले होते, “तिला याहवेहच्या मंदिरात जिवे मारले जाऊ नये.”
१६
म्हणून ती घोडे जिथून राजवाड्याच्या मैदानात प्रवेश करतात तिथे पोहोचताच त्यांनी तिला ताब्यात घेतले आणि तिथे तिला जिवे मारण्यात आले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options