2 करिंथकरांस २:५-८
५
जर कोणी दुःख दिले, तर त्याने केवळ मलाच अधिक दुःख दिले असे नाही तर काही अंशी तुम्हा सर्वांना दुःख दिले आहे—त्यापेक्षा अधिक कडक शब्दात बोलू इच्छित नाही.
६
तुम्ही सार्यांनी बहुमताने त्याला शिक्षा दिली ती पुरेशी आहे.
७
याउलट, त्याला आता क्षमा करण्याची व त्याचे सांत्वन करण्याची वेळ आहे, नाही तर तो अतिशय दुःखामध्ये बुडून जाण्याची शक्यता आहे.
८
आता मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही त्याच्यावर प्रीती करता याची त्याला खात्री द्या.
Settings