2 करिंथकरांस २:१४-१७
१४
परंतु परमेश्वराची स्तुती असो! कारण ते आम्हाला ख्रिस्ताच्या विजयोत्सवात आमचे नेत्रृत्व करण्यास आमच्यापुढे चालतात व आम्ही त्यांचे दास असून त्यांच्यामागे चालतो आणि प्रभूंच्या ज्ञानाविषयीचा सुगंध सर्वत्र पसरविण्यासाठी ते आमचा उपयोग करून घेतात.
१५
ज्यांचे तारण होत आहे व ज्यांचा नाश होत आहे त्या सर्वांसाठी आम्ही परमेश्वरासाठी ख्रिस्ताचा सुगंध असे आहोत
१६
एकाला आम्ही असा सुगंध आहोत की ज्यामुळे मरण येते व दुसर्याला असा सुगंध आहोत की ज्यामुळे जीवन मिळेल. आणि अशा कामासाठी कोण योग्य आहे?
१७
आम्ही अशा अनेक लोकांसारखे नाही की जे परमेश्वराचे वचन सांगून लाभ मिळवितात. उलट ख्रिस्तामध्ये आम्ही परमेश्वरासमोर प्रामाणिकपणाने आणि परमेश्वराने पाठविलेल्या माणसाप्रमाणे बोलत असतो.
Settings