2 इतिहास ३६:७-१०
७
नबुखद्नेस्सरने याहवेहच्या मंदिरातील वस्तूसुद्धा बाबेलमध्ये नेल्या आणि त्या तिथे त्याच्या मंदिरात ठेवल्या.
८
यहोयाकीमच्या कारकिर्दीतील इतर घटना, त्याने केलेल्या घृणास्पद गोष्टी आणि त्याच्याविरुद्ध जे काही होते, ते सर्व इस्राएली आणि यहूदीयाच्या राजांच्या पुस्तकात लिहिलेल्या आहेत. आणि त्याचा वारस म्हणून त्याचा पुत्र यहोयाखीन राजा झाला.
९
वयाच्या अठराव्या वर्षी यहोयाखीन राजा झाला आणि त्याने यरुशलेमात तीन महिने दहा दिवस राज्य केले. त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले.
१०
वसंतऋतूमध्ये राजा नबुखद्नेस्सरने त्याला बोलाविणे पाठवले आणि त्याला बाबेलमध्ये आणले, त्याचबरोबर याहवेहच्या मंदिरातील मौल्यवान वस्तू आणल्या आणि त्याने यहोयाखीनचा काका सिद्कीयाहला यहूदीया आणि यरुशलेमवर राजा केले.
Settings