Skip to content
2 इतिहास ३४:१४-१८

2 इतिहास ३४:१४-१८

१४
जेव्हा हिल्कियाह याजक याहवेहच्या मंदिरात नेण्यात आलेले पैसे बाहेर काढत होता तेव्हा त्याला मोशेच्याद्वारे देण्यात आलेला याहवेहच्या नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला.
१५
हिल्कियाह शाफान या सचिवाला म्हणाला, “मला याहवेहच्या मंदिरात नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला आहे.” तो त्याने शाफानकडे दिला.
१६
तेव्हा शाफान याने तो ग्रंथ राजाकडे नेला आणि त्याला अहवाल दिला: “तुमचे अधिकारी ज्याकाही गोष्टी करण्यास वचनबद्ध आहेत, त्या सर्व गोष्टी ते करीत आहेत.
१७
त्यांना जो पैसा याहवेहच्या मंदिरात मिळाला, त्यांनी तो मंदिराचे कामगार व कामाची देखरेख करणार्‍यांच्या हाती दिला आहे.”
१८
नंतर सचिव शाफान याने राजाला कळविले, “हिल्कियाह याजकाने मला एक पुस्तक दिले आहे.” आणि शाफानाने त्यामधून राजाच्या समोर वाचले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options