Skip to content
2 इतिहास २३:१-५

2 इतिहास २३:१-५

सातव्या वर्षी यहोयादाने त्याचे सामर्थ्य दाखविले. त्याने शंभर तुकड्यांचे सरदार यांच्यासोबत करार केला: यरोहामचा पुत्र अजऱ्याह, यहोहानानचा पुत्र इश्माएल, ओबेदचा पुत्र अजर्‍याह, अदायाहचा पुत्र मासेयाह आणि जिक्रीचा पुत्र अलीशाफाट.
त्यांनी यहूदीयामध्ये सर्वत्र फिरून सर्व गावातून लेवी आणि इस्राएली कुटुंबप्रमुखांना एकत्र केले. जेव्हा ते यरुशलेमकडे आले,
तेव्हा सर्व मंडळीने परमेश्वराच्या मंदिरात राजाबरोबर एक करार केला. यहोयादा त्यांना म्हणाला, “याहवेहनी दावीदाच्या वंशजांविषयी वचन दिल्याप्रमाणे राजाचा पुत्र राज्य करेल.
आता तुम्ही असे करावे: तुमच्यापैकी एकतृतीयांश याजक आणि लेवी जे शब्बाथ दिवशी कर्तव्य बजावत आहेत, त्यांनी दारांवर पहारा ठेवावा,
तुमच्यापैकी एकतृतीयांश राजवाड्यात आणि एकतृतीयांश लोकांनी पायाभरणीचे प्रवेशद्वार आणि इतर सर्वांनी याहवेहच्या मंदिराच्या प्रांगणात असावे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options