2 इतिहास २३:१२-१५
१२
जेव्हा अथल्याहने लोकांच्या धावपळीचा आणि राजाचा जयघोष करण्याचा आवाज ऐकला, तेव्हा ती त्यांच्याकडे याहवेहच्या मंदिरात आली.
१३
तिने बघितले राजा प्रवेशद्वाराच्या खांबाजवळ उभा आहे. अधिकारी आणि कर्णेवादक हे राजाजवळ उभे होते आणि राष्ट्रातील सर्व लोक हर्षोल्हास करीत कर्णे वाजवित आणि वादक त्यांच्या वाद्यांसह स्तुती करीत होते. तेव्हा अथल्याहने आपली वस्त्रे फाडली आणि ओरडून म्हणाली, “फितुरी, फितुरी!”
१४
यहोयादा याजकाने नेमणूक केलेल्या शताधिपतीच्या सेनाधिकार्यांना बाहेर पाठवले, आणि त्यांना सांगितले: “सैन्याच्या रांगेतून तिला बाहेर काढा आणि जो कोणी तिच्यामागे जाईल त्याला तलवारीने मारा.” याजकाने म्हटले होते, “तिला याहवेहच्या मंदिरात जिवे मारू नये.”
१५
म्हणून ती राजवाड्याच्या मैदानात, घोड्यांच्या प्रवेशद्वाराकडे पोहोचताच त्यांनी तिला ताब्यात घेतले आणि तिथे त्यांनी तिला ठार मारले.
Settings