2 इतिहास २२:१-३
१
यरुशलेमच्या लोकांनी यहोरामचा धाकटा मुलगा अहज्याहला त्याच्या जागी राजा केले, कारण हल्ला करणारे जे लोक अरब लोकांबरोबर छावणीमध्ये आले होते त्यांनी सर्व थोरल्या मुलांचा वध केला होता, म्हणून यहूदीयाचा राजा यहोरामचा पुत्र अहज्याहने राज्य करण्यास सुरुवात केली.
२
वयाच्या बावीसाव्या वर्षी अहज्याह राजा झाला आणि त्याने यरुशलेमात एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्याह होते, जी ओमरीची नात होती.
३
तो सुद्धा अहाबाच्या घराण्याच्या मार्गाने चालला, कारण त्याच्या आईने त्याला दुष्टतेने वागण्यास प्रोत्साहन दिले.
Settings