Skip to content
2 इतिहास २१:१६-२०

न्यायनिवाडा पूर्ण होतो व मृत्यू

2 इतिहास २१:१६-२०
१६
याहवेहनी यहोरामच्या विरुद्ध पलिष्टी लोकांचे आणि कूशी लोकांच्या जवळ राहणार्‍या अरब लोकांचे शत्रुत्व जागृत केले.
१७
त्यांनी यहूदीयावर हल्ला केला, त्यावर आक्रमण केले आणि राजाच्या राजवाड्यात सापडलेली सर्व मालमत्ता, त्याची मुले आणि स्त्रियांना घेऊन गेले. सर्वात धाकटा यहोआहाज याच्याशिवाय एकही पुत्र त्याच्याकडे राहिला नव्हता.
१८
हे सर्व झाल्यानंतर याहवेहनी यहोरामला आतड्यांच्या असाध्य आजाराने त्रस्त केले.
१९
याकाळाच्या दरम्यान, दुसऱ्या वर्षाच्या शेवटी या रोगामुळे त्याची आतडी बाहेर आली आणि तो अत्यंत वेदनांनी मरण पावला. त्याच्या लोकांनी त्याच्या सन्मानार्थ अंत्यसंस्कार केले नाहीत, जसे त्याच्या पूर्वजांसाठी केले होते.
२०
यहोराम राजा झाला तेव्हा तो बत्तीस वर्षांचा होता आणि त्याने यरुशलेममध्ये आठ वर्षे राज्य केले. तो मरण पावला याचे कोणालाही दुःख वाटले नाही आणि त्याला दावीदाच्या नगरात पुरला गेला, परंतु राजांच्या कबरेत पुरले नाही.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options