मुख्य मजकुरावर जा
1 थेस्सलनीकाकरांस १:२-५

थेस्सलनीकाकरांच्या विश्वासासाठी उपकारस्तुती

1 थेस्सलनीकाकरांस १:२-५
आमच्या प्रार्थनांमध्ये तुम्हाला निरंतर स्मरण करीत, तुमच्या सर्वांबद्दल सतत परमेश्वराचे आभार मानतो.
आपले पिता परमेश्वरापुढे तुमचे विश्वासाचे कार्य व प्रीतीने केलेले श्रम आणि आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरील आशेचा धीर यांची आम्ही निरंतर आठवण करतो.
परमेश्वराचे प्रीतीस पात्र माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला माहीत आहे की परमेश्वराने तुम्हाला निवडले आहे.
कारण आमची शुभवार्ता तुमच्याकडे केवळ शब्दाने नव्हे, परंतु शक्तीने, पवित्र आत्म्याने आणि पूर्ण खात्रीने आली. तुमच्याकरिता तुम्हामध्ये तुमच्याबरोबर राहत असताना आम्ही कसे राहिलो हे तुम्हाला माहीतच आहे.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options