1 शमुवेल ३१:१-५
१
पलिष्ट्यांनी इस्राएलविरुद्ध युद्ध केले; इस्राएली लोक त्यांच्यापुढून पळून गेले आणि गिलबोआ डोंगरावर पुष्कळजण मारले गेले.
२
पलिष्ट्यांनी शौल आणि त्याच्या पुत्रांचा जोरात पाठलाग केला आणि त्यांनी त्याचे पुत्र योनाथान, अबीनादाब आणि मलकी-शुआ यांना ठार मारले.
३
शौलाच्या सर्व बाजूंनी युद्ध भयंकर वाढत गेले आणि जेव्हा धनुर्धरांनी त्याला गाठले व गंभीररित्या जखमी केले.
४
तेव्हा शौल त्याच्या शस्त्रवाहकाला म्हणाला, “तुझी तलवार उपस आणि मला आरपार भोसक, नाहीतर हे बेसुंती लोक येऊन मला भोसकतील व माझी विटंबना करतील.” परंतु त्याचा शस्त्रवाहक घाबरून गेला होता आणि तो तसे करेना; तेव्हा शौलाने स्वतःची तलवार घेतली आणि तिच्यावर तो पडला.
५
जेव्हा शस्त्रवाहकाने पाहिले की शौल मरण पावला आहे, तेव्हा तो सुद्धा आपल्या तलवारीवर पडला आणि त्याच्याबरोबर मरण पावला.
Settings