Skip to content
1 शमुवेल १४:२८-३१

1 शमुवेल १४:२८-३१

२८
नंतर त्याला एका सैनिकाने सांगितले, “तुझ्या पित्याने सैन्याला सक्त शपथेने बद्ध केले की ‘आज जो कोणी भोजन करेल तो शापित होईल!’ म्हणूनच लोक खूप थकून गेले आहेत.”
२९
योनाथान म्हणाला, “माझ्या पित्याने देशावर कष्ट आणले आहे. हे थोडे मध चाखून माझे डोळे पाहा किती टवटवीत झाले आहेत.
३०
आपल्या शत्रूकडून मिळालेल्या लुटीतील लोकांनी काही खाल्ले तर किती बरे असते. पलिष्ट्यांचा संहार केल्याचा आनंद यापेक्षा मोठा असता काय?”
३१
त्या दिवशी मिकमाशपासून अय्यालोन पर्यंत पलिष्ट्यांना त्यांनी मारले होते, त्यामुळे ते अतिशय थकले होते.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options